‘तो’ अश्लील फोटोंमध्ये करायचा टॅग, ‘माजी मिस इंडिया वर्ल्ड’नं दाखल केली FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २००६ मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकणारी सुपर मॉडेल नताशा सूरी या दिवसांमध्ये बरीच चर्चेत आहे. ‘किंग लिर’, ‘बाबा ब्लॅक शीप’ अशा बर्‍याच वेब सीरिजवर ती दिसली आहे. आता नताशाने एका व्यक्तीविरूद्ध सायबर छळाचा गुन्हा दाखल केला आहे. एक व्यक्ती सतत आपल्यामागे पडली असून अनेक अश्लील फोटोंमध्ये आपल्याला टॅग करत असल्याचा आरोप यावेळी तिने केला. नताशाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती गेल्या अडीच महिन्यांपासून अनेक अश्लील वेबसाइट्सवर अनेक अस्पष्ट अश्लील छायाचित्रांमध्ये तिचे नाव वापरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नताशाने मुंबई दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार फ्लिन रेमेडीओज नावाची व्यक्ती नताशाबद्दल संभ्रम पसरवित आहे. तो तिला सतत अस्पष्ट अश्लील फोटो किंवा नग्न फोटोंमध्ये टॅग करीत आहे. याची सुरुवात नोव्हेंबर 2019 मध्ये एका लेखासह प्रकाशित चित्रासह झाली. लेखात बाथरूममध्ये बंद असलेल्या मुलीचा अस्पष्ट फोटो होता. फ्लिनने ते चित्र घेतले आणि त्यात नताशाला टॅग केले.

हे प्रकरण नताशा सुरीचे वकील माधव थोरात हँडल करत आहेत. त्यांच्या मते, संपूर्ण प्रकरणाची माहिती 24 डिसेंबर रोजी सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन सेलला देण्यात आली होती, पण हे प्रकरण सतत वाढतच जात होतं. अशा परिस्थितीत पोलिसांना एफआयआर नोंदवावा लागला. नताशा सूरींनी माध्यमांना सांगितले आहे की, ‘या व्यक्तीने प्रथम नताशा सूरी सिंग नावाचे ट्विटर हँडल तयार केले होते आणि नंतर त्याने मला अनेक अश्लील छायाचित्रांमध्ये टॅग करण्यास सुरवात केली. नताशा सुरी सिंग असे नाव नसले तरी. हे जाणूनबुजून मला त्रास देत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like