Former MLA Mohan Joshi | उपदेश देण्यापेक्षा वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचा निषेध करावा; माजी आमदार मोहन जोशींचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू आणि हिंदुत्व यावर खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी भाष्य केलं, आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी त्यावर उपदेश करण्यापेक्षा सध्याच्या वाढत्या महागाईबद्दल बोलावे आणि त्याचा निषेध करावा, असा टोला माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी चांगलाच समाचार घेतला.

 

हिंदू आणि हिंदुत्व यावर राहुल गांधी यांच्या मनात संभ्रम असल्याचे विधान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आणि हिंदू आहात, तर मोगलांनी (Mughals) मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचा निषेध करा ! असा उपदेश त्यांनी खासदार राहुल गांधी यांना केला. याचा समाचार घेताना मोहन जोशी  म्हणाले, राहुल गांधी हे काँग्रेसचे अखिल भारतीय नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाची उंची चंद्रकांत पाटील गाठू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींना उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांना ते शोभत नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी पाटलांना बराच वेळ लागणार आहे. त्यांनी अशा भानगडीत पडू नये.

 

 

यापेक्षा मोदी सरकारच्या (Modi government) चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाई वाढते आहे,
त्याविरुद्ध आवाज उठवून चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध करावा.
तसेच, पाटील यांना पुण्यातून आमदारकी मिळालेली आहे.
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) त्यांच्याच भाजपची सत्ता आहे
आणि नदी सुधारणा, 24 तास पाणीपुरवठा योजना असे लांबलेले प्रकल्प तसेच रस्त्यातील खड्डे यावर पाटील यांनी मतप्रदर्शन करावे.
आपल्या पक्षाचे अपयश झाकून ठेवू नये, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | Rather than preaching, the central government should protest against rising inflation; Former MLA Mohan Joshi slammed Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा