Former MLA Mohan Joshi | 50 वर्षांच्या उठाठेवीपेक्षा 5 वर्षात काय केले सांगा? माजी आमदार मोहन जोशींचा आ. चंद्रकांत पाटील यांना सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Former MLA Mohan Joshi | काँग्रेस (Congress) पक्षाने 50 वर्षात काय केले? हे सांगण्याची उठाठेव करण्यापेक्षा भाजपने (BJP) गेल्या पाच वर्षात पुणेकरांना काय दिले याचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील (Chandraknat Patil) यांनी द्यावे, असा सवाल माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केला आहे.

 

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोहन जोशी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला. काँग्रेसची 50 वर्ष आणि भाजपची 5 वर्ष असे सूत्र प्रचारात मांडणार आहोत असे पाटील म्हणाले. काँग्रेस पक्षाने पुण्यासाठी खूप कामे केली आणि पुणेकरांना त्याची माहिती आहे. काँग्रेसचा आढावा घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा भाजपने पाच वर्षात काय दिले ? ज्या पुणेकरांनी भाजपचे खासदार, आठ आमदार आणि 100 नगरसेवक निवडून दिले, त्या पुणेकरांसाठी परतफेड काय केली ? एकही मोठा प्रकल्प भाजपला कार्यान्वित करता आलेला नाही. ‘साबरमती’च्या (Sabarmati River) धर्तीवर मुळा मुठा नद्यांची सुधारणा (Pune River Development Project) करू असे आश्वासन दिले. नदी सुधारणा प्रकल्पाला विलंब लागला, जायका प्रकल्प (Jica Project) महागला, गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना (Pune Smart City Project) फसली, पाच वर्ष भाजपने अपयशी कारभार केला. शहरातील रस्त्यांची दूरवस्था करून पुणेकरांना मनस्ताप सोसावा लागला, अशी टीका मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली.

 

 

महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी पुणेकरांपुढे विकास कामे (Pune Development Work) मांडू शकणार नाहीत असे सांगून
मेट्रो रेल्वे (Pune Metro) प्रकल्प हा कॉंग्रेस पक्षाने पुण्यात (Pune News) आणला याची आठवण भाजपने ठेवावी,
असाही टोला मोहन जोशी यांनी लगावला. गेल्या पन्नास वर्षात भाजपच्या लोकांनी महापालिकेत (Pune Corporation) पदे मिळविली,
त्यांचाही हिशेब मांडा, असे मोहन जोशी म्हणाले.

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | What did you do in 5 years, rather than 50 years? Former MLA Mohan Joshi’s Question to BJP leader Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा