Former MLA Ravikant Patil | सोलापुरात जुगार अड्ड्यावर छापा ! इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Former MLA Ravikant Patil | येथील होटगी (hotgi road solapur) रोडवरील क्लब ९ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा (Solapur Police Crime Branch) टाकून कर्नाटकमधील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील (Former MLA Ravikant Patil) यांच्यासह २९ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी यावेळी २ लाख २४ हजार ५४० रुपयांची रोकड, ४ लाख १९ हजारांचे मोबाईल, १३ हजारांचे जुगार साहित्य असे एकूण ६ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल आहे.

 

दरम्यान, माजी आमदार रविकांत यांना (Former MLA Ravikant Patil) अटक झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर (vijapur naka police station) मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा सर्व २९ जणांची जामीनावर मुक्तता केली आहे.

होटगी रोडवरील क्लब ९ येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त हरीश बैजल (harish baijal solapur police commissioner) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने छापा टाकला. त्यावेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र हॉटेलमध्ये गेल्यानंतर पोलिसांना २९ जण हे जुगार खेळताना आढळून आले. जुगार खेळताना पैशांऐवजी कॉइनचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. पैसे देऊन हे कॉइन खरेदी करण्यात येत होते. पोलिसांनी पाच हजार रुपयांचे कॉईन्स, रोख रक्कम, काही मुद्देमाल असा संदेश लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना अटक केली.
अटक केलेल्या सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात बाहेर फरशीवरच बसवले होते.
तर माजी आमदार रविकांत पाटील यांना मात्र चौकशी कक्षात बसविण्यात आले होते.
पाटील यांना अटक झाल्याचे समजताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.
त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

 

माजी आमदार रविकांत पाटील स्वतः जुगार अड्डा चालवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
येथे येणारे बहुतांश लोक हे कर्नाटकातील असल्याचे समोर आले आहे.
मोठ्या आलिशान गाड्यांमधून हे लोक सोलापुरात जुगार खेळण्यासाठी येत होते.
पोलिसांनी ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी काही जण यशस्वी देखील झाले.

 

Web Title :- Former MLA Ravikant Patil | raid on gambling point club 9 resto bar in solapur 29 arrested including former mla ravikant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Monalisa Bikini Photo Viral | मोनालिसाच्या बिकिनीतील फोटोनं चाहत्यांच वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो

Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं केलं स्वत:लाच ट्रोल, ‘सफरचंद’ सोबत केली तुलना

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लग्नानंतर तब्बल 1.2 करोड रुपयांच्या कारमध्ये विक्की जैनसोबत पोहचली नववधू अंकिता लोखंडे.