माजी आमदाराच्या बहिणीचा अपघाती मृत्यू

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांची बहीण आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मधुकर चौधरी यांची कन्या स्नेहजा रुपवते यांचं अपघाती निधन झालं. जळगावच्या पाळधी फाट्याजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघाताने रुपवते आणि चौधरी परिवार दुःखाचा डोंगर कोसला आहे.

रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलीचे शनिवारी लग्न होते, स्नेहजा रुपवते या देखील त्या लग्नाला गेल्या होत्या. भाचीचे लग्न आटोपल्यानंतर त्या काही नातेवाईकांसह मुंबईला परत येत असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटून हा अपघात झाला. या भीषण अपघातात स्नेहजा यांचा मृत्यू झाला. कारमधील चालक आणि इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्नेहजा रुपवते यांची ओळख :

स्नेहजा रुपवते या विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कन्या होत्या. दादासाहेब रुपवते यांच्या सून तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहीण होत्या. काँग्रेस नेते आणि बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दिवंगत अ‍ॅड. प्रेमानंद रूपवते यांच्या पत्नी होत्या.