एकनाथ खडसे कधी बांधणार घड्याळ ? ‘या’ कट्टर समर्थक अन् माजी आमदारानं सांगितला Timing !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचं वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. राजकीय वर्तुळाच चर्चा आहे की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. एकनाथ खडसेंचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी असा दावा केला आहे की, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, उदेसिंग पाडवी म्हणाले, “एकनाथ खडसेंची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं.” असंही पाडवी म्हणाले आहेत.

पुढं बोलताना पाडवी म्हणाले, “त्यांना राष्ट्रवादीत योग्य मान-सन्मान मिळेल आणि त्यांच्या प्रवेशानं उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार” असा दावाही पाडवी यांनी केला आहे.

‘खडसे पक्षांतर करणार नाही’
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सोबत राहिलं पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळतं. त्यामुळं ते पक्ष सोडून जाणार नाहीत.” असा विश्वासही त्यांनी नुकताच व्यक्त केला होता.