माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अखिल मंडई मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे आज पहाटे अडीच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

अखिल मंडई मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या अनेक सामाजिक कामात त्यांचा महत्वाचा वाटा होता. युद्ध व आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत पाठविण्यात त्यांचा सहभाग असे. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते. १९७४ -७५ मध्ये ते महापौर झाले. मंडईमध्ये येणाऱ्या शेतकरी व गरीबांना किमान दोन घास खाता यावेत, या हेतूने महाराष्ट्रात प्रथम १९७४ मध्ये झुणका भाकर केंद्र सुरु केले. तेव्हा त्यांनी महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत १९७७ ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. १९९१ मध्ये आमदार झाले. शिवाजी मराठा सोसायटीचे ते मानद सचिव, अ. भा. मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार, सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त आणि बदामी हौद संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

पुणे ते माण (सातारा) पाठलाग करुन अपहरण झालेल्या तरुणाची पाेलिसांकडून सुखरुप सुटका