US : निवडणुकीपूर्वी ‘या’ वादात सापडले डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एका माजी मॉडलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एमी डोरिसने आरोप केला आहे की, 23 वर्षापूर्वी ओपन टेनिस चॅम्पियनशिप दरम्यान ट्रम्प यांनी तिच्यासोबत जबरदस्ती केली होती. ट्रम्प यांनी या आरोपचे खंडण केले आहे. त्यांच्या वकिलाने दावा केला आहे की, 3 नोव्हेंबरला होणार्‍या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी त्यांची प्रतिमा बिघडवण्यासाठी हा आरोप करण्यात आला आहे. डोरिसचे म्हणणे आहे की, त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड असलेल्या जेसन बिनने ट्रम्प यांच्याशी भेट करून दिली होती.

द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत डोरिसने आरोप केला की, मॅचदरम्यान व्हीआयपी बॉक्समध्ये ट्रम्प यांनी तिला जबरदस्तीने किस केले आणि घट्ट पकडून ठेवले होते. तिने म्हटले की जेव्हा ट्रम्प यांना हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आणखी घट्ट पकडले. ट्रम्प यांनी एमीला किस केले ज्यावेळी तिने ट्रम्प यांची जीभ चावली. ट्रम्प यांच्या वकिलाने या आरोपाचे खंडण केले आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्षांनी कुणाचेही शोषण केलेले नाही किंवा चुकीचे वागलेले नाहीत. त्यांनी म्हटले की जर असे झाले असते तर व्हीआयपी बॉक्समधील लोकांनी ते पाहिले असते. तर, एमीचा बॉयफ्रेंड असलेला जेसन बिनने यावर कमेंट केलेली नाही. एमीचे म्हणणे आहे की, घटनेनंतर तिच्यावर सामान्य वागण्याचा दबाव होता.

ट्रम्प यांनी केले आरोपाचे खंडण
डोरिसच्या अगोदर 2016 मध्ये अनेक महिलांनी ट्रम्प यांच्यावर शोषणाचे आरोप केलेले आहे. तर, ट्रम्प यांनीही सर्व आरोपांचे खंडण केलेले आहे. त्यांनी आरोप केला की, निवडणुक कॅम्पेनवर परिणाम करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. डोरिस आता समोर आल्याने ट्रम्प यांच्या वकिलाने प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, डोरिसचे म्हणणे आहे की, तिला आपल्या मुलींसाठी रोल मॉडल बनायचे आहे, यासाठी आता तिने घडलेला प्रसंग सांगितला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like