Ex मॉडेलची 18 गोळ्या घालून निर्घृण हत्या ! मृतदेहासोबतही केलं धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रेबेका लँड्रीथ नावाच्या Ex मॉडेलची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेबेकाच्या डोक्यात, मानेवर आणि छातीवर अनेक गोळ्यांचे घाव आढळून आले. तिला तब्बल 18 गोळ्या घालण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर तिच्या मृतदेहासोबतही घाणेरडं कृत्य करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पेनिसिल्वियाच्या एका रस्त्याचा कडेला तिचा मृतदेह आढळला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृतदेह सापडल्याच्या काही तास आधीच ही हत्या झाली होती. मृतदेह सापडल्यानंतर तिच्याजवळ कोणतंही ओळखपत्र पोलिसांना सापडलं नाही. ओळख पटण्यासाठी इतर गोष्टीही आढळल्या नाहीत. तिचे फिंगरप्रिंट घेण्यात आले व नंतर तिची ओळख पटली. तिला 18 गोळ्या घातल्याची बाबही शवविच्छेदनानंतर समोर आली.

या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ट्रैसी रोलिंस असं त्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे. हत्या आणि मृतदेहासोबत घाणेरडं कृत्य केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. सदर 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तेव्हा तो ब्लीचनं त्याचा ट्रक साफ करत होता. पोलिसांना त्याच्या ट्रकमध्ये रक्ताचे डाग आणि गोळीचे शेल सापडले आहेत. मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर रेबेकाची हत्या झाली तेव्हा आरोपीचं लोकेशन तिथंच दाखवलं गेल्याचंही समोर आलं आहे.

रेबेका 5 भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिच्या हत्येनंतर आता कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रेबेका मॉडेलिंग आणि फॅशन इंडस्ट्रीत फेमस होती. 2014 साली तिनं तिच्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात केली होती. 2014 मध्ये झालेल्या स्पर्धेत ती मिस मॅनहेटनची फायनलिस्ट ठरली होती.