‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र विरोधक केवळ आरोप करतात त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. पोलिस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे हे उद्योग आहेत, असा आरोप सत्ताधा-यांकडून संजय राठोड प्रकरणी केला जात आहे. त्यासाठी धनंजय मुंडे, सुशांतसिंह प्रकरणाचे दाखले दिले जात आहेत. सत्ताधा-यांचा हा युक्तिवाद भाजप नेते निलेश राणे यांनी खोडून काढला आहे. धनंजय मुंडे प्रकरणात तक्रारदार मुलीवर मुलीवर दबाव टाकून तक्रार मागे घ्यायला लावली. त्यानंतर मुंडे यांच्या दुसऱ्या बायकोन उपोषणाचा इशारा दिला. कालांतराने तेही प्रकरण शांत झाले. मुंडे यांनी काय देऊन हे प्रकरण सेटल केल हे आम्हाला माहित नाही. पण जनता दुधखुळी नाही. लोकांना सगळे कळते असे राणे यांनी म्हटले आहे.

राणे म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास 70 दिवसांनंतर सीबीआयकडे गेला. तोपर्यंत पुरावे नष्ट केले गेले. त्यानंतर सीबीआय आले, अशाने काय होणार ? असा सवालही राणे यांनी केला. असा कुठला मंत्री आहे जो कोर्टातून सुटला आहे. मुंडे, राठोड प्रकरणात हे लोक स्वत:ला क्लीन चिट देत आहेत. आरोप झाल्यावर साधा एफआयआर दाखल होत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी एका इंजिनीअरला घरी बोलाून बेदम मारहाण केली. त्यांच्यावर साधा एफआयआर दाखल झाला नाही. पोलिसांनी कारवाई केली असती तर ठाकरे सरकारमधील 4 पैकी 3 मंत्री आतमध्ये राहिले असते, असा दावाही राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या काळात महिला मुली अजिबात सुरक्षित नाहीत. पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही तर चौकाचौकात आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.