‘अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले तर त्यांचं स्वागत दगडी मारून केलं पाहिजे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 12 आमदार जाहीर होतील तेंव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असे काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचे स्वागत ताफ्यावर दगड मारून केल पाहिजे, अशी टीका राणे यांनी केली आहे. तसेच 12 आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध, असा सवालहीही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (दि. 1) पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजत आहे. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही, असा सवाल भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारच्या अडवणुकीकडे लक्ष वेधले. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावे जाहीर करतील. त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असे विधान पवारांनी केले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान अजित पवारांनी 12 आमदारांचा विषय उपस्थित करताचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातल आता ओठांवर आले. 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवल आहे का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.