Video : समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी मोर्चा अडविला पाेलिसांनी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने आज ३ डिसेंबर २०२० रोजी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी ओबीसी मोर्चाला परवानगी घेतली नसल्याचे कारण सांगत मोर्चा अडवला आहे. तसेच पोलिसांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना ताब्यात घेतले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षणा विरोधात न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेचा निषेध म्हणून, तसेच ओबीसी समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सदर मोर्चा समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या.

“लढा ओबीसींच्या अस्तित्वाचा, ऊठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो, नाही कोणाच्या स्वार्थासाठी एक व्हा आरक्षण टिकविण्यासाठी,” अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चेकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.