मुंबई माजी CP रोकेश मारियांचा खुलासा, म्हणाले – ‘कसाबला हिंदू दाखविण्याची ISI ची होती इच्छा, दाऊच्या गँगला मिळाली होती सुपारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच चर्चेचा विषय बनले आहे. राकेश मारिया यांनी ‘लेट मी से इट नाऊ’ (Let Me Say It Now) या आपल्या पुस्तकात मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

२६/११ हल्ल्यास हिंदू दहशतवादाचे स्वरूप देणार होते आयएसआय

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ने २६/११ हल्ल्याला हिंदू दहशतवादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. १० हल्लेखोरांना हिंदू असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट आयकार्ड पाठवण्यात आले होते. कसाब जवळ देखील एक असेच बनावट आयकार्ड मिळाले होते, ज्यावर समीर चौधरी लिहिले होते.

दाऊदच्या गॅंगला मिळाली होती कसाब ची सुपारी

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, मुंबई पोलीस दहशतवादी कसाब चे फोटो जाहीर करू शकत नाही. पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला होता की दहशतवाद्याबाबत कुठलीही माहिती ही माध्यमांपर्यंत पोहचू नये. रिटायर्ड आयपीएस अधिकारी यांचा असा देखील दावा आहे की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या गॅंगला कसाबला मारण्याची सुपारी मिळाली होती.

कसाबला फाशी कधी देण्यात आली?

२६ नोव्हेंबरला २००८ ला मुंबईमध्ये १० दहशतवाद्यांनी तीन ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले आणि शेकडो लोक जखमी झाले. या दहा दहशतवाद्यांपैकी फक्त अजमल कसाब यालाच जिवंत पकडता येऊ शकले. कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ ला पुणे येथील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.

शीना बोरा हत्येप्रकरणी देखील केले खुलासे

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणाबाबत देखील अनेक नवीन खुलासे केले आहेत. तसेही, या हाय प्रोफाइल हत्या प्रकरणाची चौकशी मारिया हेच करीत होते, त्या दरम्यानच त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या बदलीचे मुख्य कारण हे त्यांच्यावरील आरोप होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी पीटर मुखर्जीला वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

पीटर मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की त्यांनी इंद्राणी मुखर्जी आणि इंद्राणीचे पहिले पती संजीव खन्ना यांच्यासमवेत शीना बोरा खुनाचा कट रचला होता. २४ वर्षाची शीना इंद्राणीची मुलगी होती, जिची २४ एप्रिल २०१२ ला हत्या करण्यात आली. राकेश यांनी मौन सोडले असून आपल्या पुस्तकात या प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती दिली. राकेश मारिया या प्रकरणात खूप सक्रिय होते.