Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी ‘कॅब’ने ED कार्यालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कथित नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) चौकशीसाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) मंगळवारी दिल्ली अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात चक्क कॅबने गेले होते. पांडे यांचा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांतर्गत आज जबाब नोंदण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 1 मार्चपासून ते मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी संजय पांडे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक (Former Mumbai CP Sanjay Pandey) म्हणून काम केले आहे.

छडए-ले ङेलरींळेप डलरा संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त (Former Mumbai CP Sanjay Pandey) म्हणून मागील 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. ते 1986 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service (IPS) अधिकारी आहेत. पांडे यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार आज सकाळी ते 11.20 वाजता ईडीच्या कार्यालयात गेले.

 

मात्र, पांडे हे कॅबने ईडी कार्यालयात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ईडी कार्यालयात त्यांची सुमारे अडीच तास चौकशी (ED Inquiry) केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी सुट्टी देण्यात आली. यावेळी ईडीने पांडे यांचा जबाब नोंदवला आहे.

 

ईडीने आयसेंक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (Isaac Securities Pvt) नावाच्या कंपनीच्या कामकाजाशी संबंधित ही चौकशी केली आहे.
आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, इतर काही कंपन्यांपैकी एक, कथित को-लोकेशन अनियमिततेनंतर एनएसईचे सुरक्षा ऑडिट केले होते.
मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले आणि
त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनी ताब्यात घेतली.

 

एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक (Former Managing Director)
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chief Executive Officer Chitra Ramakrishna)
यांचा जबाब आधीच नोंदवला आहे. रामकृष्ण तिहार तुरुंगात (Tihar Jail) आहेत.
एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी रामकृष्ण आणि समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम
(Anand Subramaniam) यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मार्चमध्ये अटक केली होती.

 

ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग च्या आरोपांबाबत सीबीआयच्या तक्रारीची दखल घेतली होती.
NSE मधील या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करणारी प्राप्तीकर विभाग ही तिसरी एजन्सी आहे.

 

Web Title :- Former Mumbai CP Sanjay Pandey | former police commissioner sanjay pandey in a rickshaw to the ed office for questioning marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

 

CM Eknath Shinde | ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण…‘ – एकनाथ शिंदे

 

Pune Crime | जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक, रिक्षासह आठ दुचाकी जप्त (Video)