T-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येबाबत माहिती होती पण वाचवू शकलो नाही, राकेश मारियांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात टी सिरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. आपल्या पुस्तकात मारिया यांनी म्हटले आहे की, त्यांना गुलशन कुमार यांच्या हत्येबाबत आधी माहिती मिळाली होती. खबरीने त्यांना सांगितले होते. परंतु ही घटना ते टाळू शकले नाहीत. आपले पुस्तक लेट मी से इट नाऊ मध्ये माजी कमिश्नर मारिया यांनी दावा केला आहे की, खबरीने माहिती दिली होती. जेव्हा त्यांनी खबरीला विचारले की विकेट घेणार आहे, तेव्हा त्याने उत्तर मिळाले – अबु सालेम.

मारिया यांच्या माहितीनुसार खबरीने सांगितले होते की, सालेमने प्लॅन तयार केला आहे. तो शिव मंदिराजवळ गुलशन कुमार यांच्यावर हल्ला करणार आहे. मारियांनी विचारले – खबर पक्की आहे का? यावर खबरी म्हणाला – साहेब, खबर एकदम पक्की आहे, नाही तर मी तुम्हाला कशाला सांगितले असते. मारिया यांनी लिहिले आहे की, फोनवर ही माहिती मिळाल्यानंतर ते विचार करू लागले की आता काय करायचे.

गुलशन कुमार शिव मंदिरात जात असत
यानंतर मारिया यांनी दुसर्‍या दिवशी बॉलीवुडचे निर्माता-निर्देशक महेश भट्ट यांना फोन केला. भट्ट यांना मारियांनी विचारले की, ते गुलशन कुमार यांना ओळखतात का? यावर उत्तर मिळाले – होय. परंतु, एवढ्या सकाळी मारिया यांचा फोन आल्याने भट्ट यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. भट्ट यांनी मारिया यांना हेदेखील सांगितले की, गुलशन कुमार शिव मंदिरात जातात.

मारिया यांनी लिहिले आहे की, त्यांनी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचला सांगितले होते की, त्यांनी गुलशन कुमार यांना संरक्षण द्यावे. परंतु, 12 ऑगस्ट 1997 ला मारिया यांना फोन आला की, गुलशन कुमार यांची हत्या झाली आहे. तपासादरम्यान, माहिती पडले की, गुलशन कुमार यांची सुरक्षा यूपी पोलीस सांभाळत होते. यासाठी मुंबई पोलिसांनी आपली सुरक्षा परत घेतली होती. मारिया यांच्यानुसार यूपी पोलीस पूर्ण लक्ष देऊन गुलशन कुमार यांची सुरक्षा करत होते. परंतु, जेव्हा धोका कमी झाला तेव्हा त्यांची सतर्कता कमी झाली. याचाच फायदा घेऊन गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली.