Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर; पण.. राहावे लागणार तुरुंगातच

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे महामंडळाची फसवणूक (Annabhau Sathe Mahamandal Scam Case) केल्याप्रकरणी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Former NCP Legislator Ramesh Kadam Bail) यांना अखेर जामीन मिळाला आहे. मात्र इतर प्रकरणामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे (Solapur District And Sessions Court) न्यायाधीश आर. एन. पांढरे (Judge R. N. Pandhare) यांनी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

रमेश कदम यांनी आजी बायम्मा गणपत क्षीरसागर (Byamma Ganpat Kshirsagar) यांच्या नावे दुग्धव्यवसाय करणेसाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढले होते. त्यानंतर ते कर्ज वितरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला होता. शासनाची तसेच महामंडळाची जवळापास सहा लाख 36 हजार 658 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. सध्या रमेश कदम हे आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) आहेत.

सात वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला.
अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे (Adv. Milind Thobde) यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे. तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यातून फ्रीझ केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला आहे. असा युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कदम यांना जामीन मंजूर केला. पण रमेश कदम यांच्या विरोधात अजुनही काही प्रकरणे अन्य न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यांची या तुरुंगातून सुटका होणार नाही. अशी माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य
आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदम यांनी शेकडो कोटींचा
घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना 8 वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट,
2015 साली अटक (Arrested) केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांना पक्षातून
निलंबित (Suspended) केले होते.

Advt.

Web Title :   Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | Former NCP Legislator Ramesh Kadam get bail from solapur court in cheating fraud case but due to others cases he remain in jail mumbai maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला