राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार विलासराव भाऊसाहेब शिंदे यांचे आज पहाटे ५ वाजता आष्टा येथे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. याविषयी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर म्हंटले आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन झाले. लोकांमध्ये रमणारा कार्यकर्ता त्यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला. शिंदे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.’

विलासराव भाऊसाहेब शिंदे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून होते. सामान्य लोकांमध्ये रमणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आष्टा नगरीवर शोककळा पसरली आहे.