Coronavirus : पत्नीला ‘कोरोना’चा धोका असल्यानं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनच्या नावानं गोळा करतोय पैसे !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्वच देशांमधील नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू इयान ओ ब्रायन याच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पत्नीपासून दूर असून इच्छा असतानाही तो तिच्याकडे जाऊ शकत नाही. ओ ब्रायन त्याच्या कुटुंबासह ब्रिटनमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो न्यूझीलंडला आला. त्याचवेळेत कोरोनामुळे अशी स्थिती निर्माण झाली की तो तिथेच अडकून पडला आहे. आता त्याला घरी परत जाण्यासाठी लोकांकडून पैसे मागण्याची वेळ आली आहे.

ओ ब्रायनच्या परतीच्या प्रवासासाठीचे विमान उड्डाण रद्द झाले. त्यामुळे तिकिटासाठी पैसे द्यावेत यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. त्याने ट्विट करून म्हटले की, ब्रिटनमध्ये जाण्यासाठी तो पैशांची सोय कऱण्याचा प्रयत्न करत आहे. जर कोणी स्काइक किंवा व्हिडिओ कॉलवर क्रिकेट, राजकारणी, खाद्यपदार्थ, सचिन तेंडुलकर, मानसिक आरोग्य यावर बोलू इच्छित असेल आणि त्याबदल्यात काही डॉलर देऊ शकत असेल तर मी तयार आहे.

इयान ओ ब्रायनची पत्नी आणि दोन्ही मुले ब्रिटनमध्ये राहतात. त्याच्या पत्नीच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला आहे. 43 वर्षीय इयान ओ ब्रायनने सांगितले की, माझ्या पत्नीच्या जीवाची काळजी आहे. कारण तिला फुफ्फुसाचा त्रास आहे. हा व्हायरस तिच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. माझ्या पत्नीसोबत माझी दोन मुले आणि तिची आई आहे. पत्नीची आई 80 वर्षांची असल्याचीह ओ ब्रायनने सांगितले आहे.न्यूझीलंडकडून ओ ब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 कसोटी आणि 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्यानं 4 टी20 सामनेही खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 73 विकेट आहेत