पुलवामा हल्ल्याची परिस्थिती हाताळण्यात इम्रान खान अपयशी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताला जगभरातून पाठिंबा मिळत असून यामुळे पाकिस्तानची जागतिक स्तरावर नाचक्की झाली आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी या हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला. इम्रान खानला पंतप्रधानपदावरून हाकलण्यासाठी पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात दबाव वाढायला सुरूवात झाली आहे. इम्रान खान यांना हल्ल्याची स्थिती हाताळता आली नाही अशी टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी केली आहे.

इम्रान खान यांच्या नेतृत्वावर टीका करताना झरदारी म्हणाले की , ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान सातत्याने एकाकी पडला आहे. मात्र सध्या इम्रान खानच्या राजवटीत परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. इम्रान खान बालीश असून त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा काडीचा अनुभव नाही. इम्रान हा इतरांच्या सांगण्यावरून कामं करणारा असल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. माझ्या कार्यकाळात मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला झाला होता. मी हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळलं होतं. पण पंतप्रधान इम्रान खान अपरिपक्व आहेत. त्यांना नाही माहित की काय केलं पाहिजे. आम्ही आजही पाकिस्तानच्या आर्मीचं समर्थन करतो. जर भारताने त्यांच्या विरोधात काहीही योजना बनवली असेल तर आम्ही एकत्र लढू.’

पुलवामा हल्ल्याचे पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील : बिलावल भुत्तो
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हिंदुस्थानी जवानांवर केलेल्या हल्ल्याचे पाकिस्तानला भयंकर परिणाम भोगावे लागतील असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी म्हटले आहे. इम्रान खानवर टीका करताना बिलावल यांनी इम्रान खानला तिथल्या सैन्याच्या हातातील बाहुल्याची उपमा दिली.खेळण्यातील बाहुल्यासारखे असलेले पंतप्रधान ही परिस्थिती हाताळू शकत नाही. ते सध्या पॉलिटीकल स्टंट करत आहेत. मात्र त्यांच्या या स्टंटमुळे पाकिस्तान विनाशाकडे जात आहे.

प्रियंका गांधी यांच्या टीममधील 3 सहप्रभाऱ्यांपैकी ‘या’ प्रभाऱ्याची नियुक्ती 24 तासात मागे