महापालिकेच्या सभागृहात माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे तैलचित्र

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सर्व पक्षीय नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सभागृहात वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्याची मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली. ही मागणी सभेचे अध्यक्ष महापौर राहुल जाधव यांनी मान्य केली. तसेच केरळ मध्ये भीषण पूर आल्याने मदत म्हणून नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्थाना देण्याचे मान्य केले.
[amazon_link asins=’B06Y63B51W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0048ddc4-a47e-11e8-87e2-b7e7d7e9a9c0′]

पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व साधारण सभा आज सोमवारी होती. दुपारी दोन वाजता सभा सुरु झाली. नगरसेवकांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्व पक्षाच्या नेत्यांनी माजी पंतप्रधान वाजपेयी यांचा जीवनक्रम तसेच राजकीय वाटचाल यावर आपली मनोगत व्यक्त केली. वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान किती मोठे आहे हेही सांगितले. त्यामुळे सभागृहात तैलचित्र लावण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. त्यास सभेचे अध्यक्ष महापौर जाधव यांनी मान्यता दिली.
[amazon_link asins=’B07CKDTBSL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’065e54c3-a47e-11e8-9539-6d448c750861′]

केरळमध्ये ओढवलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपण काही मदत करावी अशी मागणी करण्यात आली. नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन द्यावे अशीही नगरसेवकांनी मागणी केली. ही मागणीही सभेचे अध्यक्ष जाधव यांनी मान्य केले. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करुन आजची सर्वसाधारण सभा तहकूब केली. ही सभा सहा सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे सांगितले.

इतर बातम्या

‘उमर खालिद’ हल्ल्याप्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात 

मनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतोय : जितेंद्र आव्हाड