Ex PM नवाज शरीफ यांच्या जावयला हॉटेलच्या रूमचा दरवाजा तोडून केली अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील सरकार विरोधकांविरोधात कठोर पावलं उचलत आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. सरकारविरोधी मोर्चात मरियम यांनी रविवारी भाषण केलं. ही कारवाई काही तासांनंतर झाली. मरियम यांनी सोमवारी ट्विट केलं की, कराचीत आम्ही रहात असलेल्या हॉटेल रूमचा दरवाजा पोलिसांनी तोडला. कॅप्टन सफदर अवान यांना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलं आहे.

मरियम नवाज सरकारमध्ये सैन्याच्या हस्तक्षेपाविरुद्ध उघडपणे बोलत आहेत. रविवारी कराची येथे 11 पक्षांच्या युती पब्लिक डेमोक्रॅटीक मुव्हमेंट (पडीएम) च्या रॅलीत मरियम सहभागी झाल्या. आपल्या भाषणात त्यांनी सरकारवर टीका केली. यापूर्वी सरकारच्या निषेधार्थ सामील झालेल्या अनेक नेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जात होती.

एका दिवसापूर्वी दाखल झाली होती FIR

रविवारी कराची येथील ब्रिगेड पोलीस ठाण्यात मरियम, त्यांचा पती आणि 200 कार्यकर्त्यांवर सरकारी प्रतिनिधींनी एफआयआर दाखल केली होती. त्यांच्यार जिन्नाच्या थडग्याच्या पावित्र्याचा भंग केल्याचा आरोप होता. या एफआयआरमुळं अवन यांना अटक झाल्याचं समजत आहे.