‘एन्काऊंटर’ फेम प्रदीप शर्मा नालासोपारा येथून शिवसेनेकडून विधानसभा लढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा राजकारणाच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरु असताना आज ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महिनाभरापूर्वीच त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या राजकारणात येण्याची चर्चा एवढी झाली की मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर यावर आज शिक्कामोर्तब झाले.

१९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेल्यानंतर प्रदीप शर्मा बराच काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी शर्मा यांनी केली. यात मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह कुख्यात गुंड असलेले सुहास माकडवाला, सादिक काल्या, रफीक डबा, विनोद मटकर यांचा देखील समावेश आहे.

वसई-विरार भागातील हितेंद्र ठाकूर कुटुंबाची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शर्मा यांना नालासोपारा येथून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात रिंगणात उतरतील असी चर्चा आहे. शर्मा आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like