माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरा लेब्बई मरैकयार यांनी तामिळनाडूतल्या रामेश्वरममध्ये राहत्या घरी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अखेरचा श्वास घेतला. ते १०४ वर्षांचे होते. काही दिवसांपासून मोहम्मद काही आजारांचा सामना करत होते. याशिवाय त्यांच्या एका डोळ्याला संसर्गदेखील झाला होता. मोहम्मद यांच्या पत्नीचं आधिच निधन झालं असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

दरम्यान, मोहम्मद यांच्या निधनाचे वृत्त समजताच तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि द्रमुख अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. मोहम्मद आणि अब्दुल कलाम यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अब्दुल कलाम यांचे वडील नाविक म्हणून काम करायचे. पाच भाऊ आणि पाच बहिणी अस कलाम यांच कुटुंब होत. चरितार्थ चालवण्यासाठी मासेमारी करणाऱ्यांना होडी भाड्यानं देत होते. कलाम यांचं बालपण अतिशय कष्टाचं आणि संघर्षाचं होतं.