माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करत दिली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्याच्यां प्रकृतीवर रुग्णालयाचे बारीक लक्ष असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करत दिली होती. रुग्णालयात त्यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या मेंदूत असलेली एक गाठ काढण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेल्याचे आर्मी रुग्णालयाने सांगितले आहे. अद्यापही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर मुलगा अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करुन ते सुखरुप आहेत त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी माहिती दिली होती.