पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचं निधन

लंडन : वृत्तसंस्था

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम नवाज यांचे निधन झाल्याचे समजते आहे. त्यांचे वय ६८ होते. कुलसुम नवाज यांना घशाचा कॅन्सर होता. त्यांच्यावर लंडन येथे उपचार होते. कुलसुम नवाज व्हेंटिलेटवर होत्या.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांचे पुत्र हुसेन नवाज यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्यावर जून, २०१७ पासून लंडनच्या हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते.

उपचारादरम्यानच त्यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले होते. सोमवार रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती. परंतु आज कुलसुम नवाज यांनी अखेरचा श्वास घेतला.माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांचा जन्म १९५० मध्ये झाला होता. १९७१ मध्ये दोघांचं लग्न झाले होते . कुलसुम नवाज यांची मुलगी मरियम नवाज आणि पती नवाज शरीफ सध्या रावळपिंडीमधील तुरुंगात बंद आहेत.

दरम्यान , शरीफ यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यापरकरणी ते अटकेत आहेत . बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात नवाज शरीफ यांना न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबर, नवाज शरीफ यांना ८ मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला २ मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.