दिल्ली विधानसभा : तिकीट न मिळाल्यानं ‘या’ माजी पंतप्रधानाच्या नातवानं सोडला पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या नेत्याला तिकीट मिळावे, यासाठी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यालयासमोर समर्थक धरणे धरत असताना आप ने तिकीट नाकारल्यानंतर आमदार आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी काँग्रेसचा हात धरला आहे.

आपण स्वच्छ राजनितीसाठी २ कोटी रुपयांची नोकरी सोडून राजकारणात असल्याने सांगून आदर्श यांनी अरविंद केजरीवाल यांनी करोडो रुपये घेऊन तिकीटे दिल्याचा आरोप केला आहे. आम आदमी पार्टीकडून द्वारका विधानसभा मतदारसंघातून आदर्श शास्त्री हे आमदार झाले होते. आदर्श शास्त्री यांचे तिकीट कापून आप ने माजी खासदार महाबल मिश्रा यांचे पुत्र विनयकुमार मिश्रा यांना तिकीट दिले आहे. आदर्श शास्त्री यांना काँग्रेस द्वारकामधून तिकीट देण्याची शक्यता आहे.

याबाबत आदर्श शास्त्री यांनी सांगितले की, मी तिकीट मिळाले नाही म्हणून पार्टी सोडत नाही तर, माझ्या ऐवजी ज्याला तिकीट दिले ते विनय मिश्रा हे एक दिवस अगोदर पक्षात आले आहेत. त्यांनी आपल्या ऐवजी अन्य कोणत्याही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तरी चालले असते. अरविंद केजरीवाल यांनी करोडो रुपये घेऊन विनय मिश्रा यांना तिकीट दिले आहे. मी अ‍ॅपलमधील दोन कोटी रुपयांची नोकरी सोडून स्वच्छ राजकारण करण्यासाठी आपमध्ये आलो होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like