भांडवलशाही धोक्यात, रघुराम राजन यांचा इशारा

लंडन : वृत्तसंस्था – समाजातील संभाव्य विद्रोहाची स्थिती पाहता भांडवलशाहीला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. २००८ च्या वैश्विक आर्थिक मंदीनंतर आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेकडून लोकांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळेच भांडवलशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे राजन यांनी म्हटले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये ‘बीबीसी रेडिओ-४ एस टुडे’ कार्यक्रमात बोलताना रघुराम राजन यांनी हा इशारा दिला.

अर्थव्यवस्थेचा विचार करताना जगभरातील सरकारांना सामाजिक असमानता नजरेआड करून चालणार नाही, असं सांगतानाच लोकांना समान संधी देण्यात भांडवलशाही कमी पडू लागलीय. भांडवलशाहीकडे जे लोक आकर्षित होत आहेत, त्यांची अवस्था अत्यंत वाईट होत आहे, असं ते म्हणाले.

संसाधनांमध्ये समतोल राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही गोष्टीची निवड करू शकत नाही. त्यामुळे सर्वांना समान संधी देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणं हेच महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. पूर्वी साधारण शिक्षण घेतल्यानंतर मध्यम वर्गाला नोकरी मिळायची. मात्र २००८च्या वैश्विक आर्थिक संकटानंतर परिस्थितीत बदल झाला. यश मिळविण्यासाठी उच्च शिक्षण घेणं बंधनकारक होऊ लागल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

ह्याहि बातम्या वाचा

‘काँग्रेसने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे’

‘या’ प्रकरणात सापडल्याने पोलीस हवालदाराचे निलंबन

शरद पवारांनी समंजस्य दाखवले असते तर सुजय भाजपात गेले नसते : अशोक चव्हाण

सुजय विखे Is in trending पण…