‘सावधान इंडिया’ मधून काढण्यात आल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह आता सद्गगुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ‘भडकला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सावधान इंडियामध्ये काम करणारे अभिनेते सुशांत सिंह पुन्हा एकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. यावेळी सुशांत इशा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर भडकल्याचे आढळून आले आहे. सुशांत यांनी जग्गी वासुदेव बाबतची नाराजी सोशल मीडियावर देखील व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत जग्गी वासुदेव यांच्या रोग कार्यक्रमावर टीका करत हा त्यांच्या आयुष्यातील वाईट अनुभव असल्याचे सांगितले आहे.

सुशांतने व्हिडिओवर घेतला आक्षेप
सद्गुरुंनी त्यांच्या योग कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सुशांत देखील दिसून येत आहे. या व्हिडिओवर आक्षेप घेत सुशांतने जग्गी वासुदेव यांना लक्ष्य केले आहे. सुशांत म्हणाला, सद्गुरु मी तुम्हाला माझे फोटो वापरण्याची परवानगी दिली आहे का ? यानंतरही, जर तुम्ही माझे फोटो वापरलेले असतील तर तुमच्या योग कार्यक्रमात सामील झाल्यावर मी व माझ्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेचा देखील उल्लेख करा.

आमच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट अनुभव
हा आमच्या जीवनातील सगळ्यात वाईट अनुभव होता. तुम्ही दोन दिवसात सहा प्रकारचे कपडे बदलायला लावले होते, ते खूप मजेदार होते. मात्र जग्गी वासुदेव यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रितिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. याआधी सुशांत हे जेएनयु आणि सीएए बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता.

सावधान इंडियातून सुशांतची हकालपट्टी करण्यात आलेली आहे
सीएए विरोधातील आंदोलनात सामील झाल्यामुळे सुशांत याला सावधान इंडियातून काढण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे. शो मधून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी स्वतः सोशल मीडियावर सांगितले होते. सुशांतने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून देखील अभिनय साकारलेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like