TATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC ब्राऊझरचा भारतीय पर्याय iC Browser, 4 लाख ‘विक्रमी’ डाऊनलोड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आत्मनिर्भर भारत मिशनसाठी टाटा कंपनीच्या माजी कर्मचार्‍याने पीएम मोदी यांच्या बनारस लोकसभा मतदार संघात भारताचा पहिला देशी ब्राऊझर लाँच केला आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आयसी ब्राऊझर अ‍ॅप रिलिज होताच काही तासांच्या आत ते 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. आयसी ब्राऊझर अ‍ॅप भारतीयांसाठी चीनी युसी ब्राऊझरला चांगला पर्याय ठरत आहे.

सॉफ्टवेयर इंजिनियर अर्पित सेठ यांनी हे अ‍ॅप बनवले आहे, जे मल्टीनॅशन कंपनी टीसीएसमध्ये अनेक वर्षे कार्यरत होते. अर्पित यांचे म्हणणे आहे की, चीनी अ‍ॅप्समधून भारतीय डाटाची चोरी रोखण्यासाठी आयसी ब्राऊझर बनवण्यात आले आहे. याचा सर्व्हर भारतातच असल्याने डाटा लीक होण्याची शक्यता नाही. ही आमच्यासाठी खुप अभिमानाची बाब आहे की, लाँच झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

आयसी ब्राऊझरची खासियत ही सुद्धा आहे की, हा कोणत्याही प्रकारचा डाटा स्टोअर करत नाही, ज्यामुळे डाटा किंवा अन्य महिती लीक होण्याची शक्यता अजिबातच राहात नाही.

यामध्ये ब्राऊजिंग स्पीडसुद्धा खुप जास्त आहे. याचा वापर केल्यानंतर सर्च केलेला डाटा हिस्ट्रीतून आपोआप क्लियर होतो.

आयसी ब्राऊझरमध्ये एक अतिशय खास शॉर्ट व्हिडिओ फिचर जोडण्यात आले आहे, ज्याने चीनी अ‍ॅप टिकटॉकला खुप मागे टाकले आहे. या अ‍ॅपमध्ये यूजर्सना सहज इंटरफेस मिळतो, ज्याद्वारे ते व्हिडिओ क्रिएट, एडिट आणि शेयर करू शकतात.

यूजर्स प्लॅटफॉर्मवरील शॉर्ट व्हिडिओ सहजपणे वर-खाली स्वाईप करून पाहू शकतात. सोबतच शॉर्ट न्यूच फिचरच्या माध्यमातून जगभरातील बातम्या सर्वप्रथम मिळवू शकतात.

देश-विदेशातील बातम्या आणि मनोरंजक व्हिडिओ या ब्राऊझरद्वारे सर्वप्रथम पाहता येतील. यामध्ये ट्रेंडिंग न्यूजची सुद्धा माहिती सविस्तर मिळते.

आयसी ब्राऊझरची खासियत

1. भारतात सर्व्हर असल्याने डाटा सुरक्षित आहे.

2. देशभरातील लोकप्रिय व्हिडिओ या ब्राऊझरच्या पेजमध्ये पाहता येतील. यूजर्स मनोरंजक शॉर्ट व्हिडिओ बनवून ते एडिट आणि शेयर करू शकतात.

3. देश-विदेशातील बातम्या प्राप्त करू शकता.

4. डाटासोबतच इतर माहिती लीक होण्याची शक्यता नाही. वेगसुद्धा चांगला आहे.

5. या अ‍ॅपच्या माध्यमातून शॉपिंग करता येते.

6. हे एक सुरक्षित आणि स्वदेशी अ‍ॅप आहे.

आयसी ब्राऊझर अ‍ॅप एक फ्री अ‍ॅप आहे, जे तुम्ही गूगल प्लेस्टोरवरून डाऊनलोड करू शकता. यासाठी येथे क्लिक करा…
https://play.google.com/store/apps/details?id=com.localpe&hl=en