जव्हार : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी (दि. 9) सांयकाळी दिर्घ आजाराने निधन झाले.
सावरा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी (दि. 10) दुपारी एक वाजता त्यांच्या वाडा येथील निवासस्थानाहून निघणार आहे.