Former UP Governor Ram Naik | राज्यपाल पदावरील व्यक्तिने संघर्ष न करता काम केले तर अवघड असे काही नाही : माजी राज्यपाल राम नाईक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Former UP Governor Ram Naik | राज्यपाल पदावरील व्यक्तिने संघर्ष न करता काम केले तर अवघड असे काही नाही. उत्तर प्रदेशचा राज्यपाल म्हणून काम करताना माझ्यावर कधी दबाव टाकण्यात आला नाही किंवा दबावाखाली मी देखिल कुठलंही काम केले नाही. उलट राज्यपाल पदावर असताना केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयकाची भुमिका अत्यंत यशस्वीरित्या पार पाडू शकलो याचे समाधान असल्याचे उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (Former UP Governor Ram Naik) यांनी सांगितले.

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने Pune Shramik Patrakar Sangh (PUWJ) ‘राज्यपालाची कर्तव्ये आणि मर्यादा’ या विषयावरील वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशमध्ये दोन भिन्न पक्षांच्या सरकारमध्ये काम करताना आलेले अनुभवन कथन करतानाच विविध प्रश्‍नांवर दिलाखुलास उत्तरे देतानाच नाईक यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर बोलणे टाळले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरवदे व्यासपीठावर उपस्थित होते. (Pune Union of Working Journalists)

 

राम नाईक यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवाचे व घेतलेल्या निर्णयांची तपशीलवार माहिती यावेळी दिली. ते म्हणाले, की राज्यपाल हा राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय राखणारा मुख्य दुवा आहे. माझ्या कारकिर्दीच्या पहील्या अडीच वर्षात अखिलेश यादव यांचे सरकार होते तर उत्तरार्धात योगी आदीत्यनाथ (Yogi Adityanath) यांचे सरकार होते. उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी ९ जणांची नावे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी माझ्याकडे पाठविली होती. परंतू यापैकी अनेकांवर गुन्हे दाखल असलेल्या तक्रारी आल्या. तक्रारदारांकडूनच पुरावे घेउन निर्णय घेतला. ९ पैकी ४ जणांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. परंतू माझ्या म्हणण्यात तथ्य असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही फारसे ताणून न धरता नवीन नावांची यादी पाठविली व त्यांची मी नियुक्ती केली. (Former UP Governor Ram Naik)

केंद्रातील भाजप सरकारचा (BJP Government) कधी दबाव आला का, यावर बोलताना नाईक म्हणाले दबाव येण्याचा काहीच प्रश्‍न नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यापेक्षा मी वयाने मोठा आहे. आमचे मित्रत्वाचे संबध होते. त्यामुळे माझ्यावर कधी दबाव आणला नाही. उलट एखाद्या विषयावर मांडलेले मत ते विचारात घेत. या पदावर काम करताना संघर्ष टाळला तर काम कुठलिही अडचण येत नाही, हा अनुभव मला राज्यपाल पदाच्या काळामध्ये आला. उलट या पदावर काम करताना आपल्याला त्या राज्याच्या विकासात भर घालणारी अनेक कामे करता येउ शकतात.

 

उत्तर प्रदेशच्या लोकायुक्ताच्या रिक्त जागेवर न्यायालयीन लढाईनंतर निवृत्त न्यायमूर्तिंची नियुक्ती, राजभवन मध्ये सर्वच राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा, उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस साजरा करण्याची सुरूवात, ऐतिहासिक प्रसंगातील सनावळ्यांमध्ये दुरूस्ती, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये सांस्कृतिक करार, कुष्ठ पिडीतांचा निर्वाह भत्ता ३०० वरून अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय तसेच त्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्याचा निर्णय या कालावधीत घेतला. विशेष असे की राज्यपाल पदी असतानाच अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबाद चे आयोध्या नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उत्तर प्रदेश विकासाच्या वाटेवर: रोजगारासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या घटत आहे.
विकासाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश खूप मागे होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वीज,
पाणी पुरवठा, कायदा सुव्यवस्था यासारख्या उद्योगांसाठी पूरक ज्या घटकांकडे लक्ष द्यायला सुरूवात झाली.
मागील आठ वर्षात उत्तर प्रदेशामध्ये मोठ्याप्रमाणावर सुधारणा होत असून रस्ते प्रशस्त झाले आहेत.
नवीन विमानतळांची कामे सुरू आहेत. उद्योगांना गती मिळत आहे.
इज ऑफ डुईंग बिजनेस मध्ये राज्य १६ व्या क्रमांकावरून दुसर्‍या क्रमांकावर आले आहे.
यामुळे स्थानीक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढत असल्याने येथून केवळ रोजगारासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या कमी होत आहे.
तेथील स्थानीक नागरिकांनाही हा फरक जाणवत असल्याने पहिल्यांदाच एका पक्षाला सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळाल्याचा इतिहास झाला आहे,
असा दावा राम नाईक यांनी यावेळी केला.

 

Web Title :- Former UP Governor Ram Naik Nothing is difficult if the person holding the post of Governor works without conflict: Former Governor Ram Naik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

 

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा