पुर्वी कामाला असलेल्यानेच फोडले हॉटेल अन् लंपास केला ऐवज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हॉटेलमध्ये पुर्वी काम करणाऱ्या कामगारानेच हॉटेल बंद केल्यानंतर कंपाउंडवरून उडी मारून आत प्रवेश करत हॉटेलमधील रोख ९० हजार व ३० हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल टॅब व इतर साहित्य लंपास केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आदित्यनारायण यादव (वय ३१, रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी सौरभ रॉय यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यनारायण यादव हा यापुर्वी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ग्रॅंड मसाज येथे कामाला होता.रविवारी रात्री हॉटेल बंद करण्यात आले होते.त्यावेळी यादव हा हॉटेलच्या कंपाऊंडवरून उडी मारून आत घुसला.

त्यानंतर त्याने हॉटेलमध्ये प्रवेश करत कॅश काऊंटरच्या मधील ९० हजार रोख, पाच मोबाईल टॅब आणि एक एक्साईज बुक, एक बिल अशा महत्त्वाच्या फाईल असलेला एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लोखंडी तिजोरीसह लंपास केला. त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

सिने जगत –
‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’