माजी जि.प. सदस्याला जीवे मारण्याची धमकी देत 50 लाखाच्या खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिन खरेदी करण्यापुर्वी संमती घेवुन रोख पैसे दिल्यानंतर खरेदी खत करून पुन्हा त्याच जमिनीवर अतिक्रमण करून कंपाऊंड टाकल्यानंतर जाब विचारणार्‍यास गेलेल्या माजी जि.प. सदस्याला तुमचा जमिनीशी काय संबंध, पुन्हा ही जमिन हवी असेल तर 50 लाख द्यावे लागतील नाही तर जीवे ठार मारू अशी धमकी देणार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांता उर्फ चंद्रकांत शंकर भिंताडे, सागर चंद्रकांत भिंताडे आणि मयुर चंद्रकांत भिंताडे (सर्व रा. भिवडी, ता. पुरंदर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी जि.प. सदस्य शहाजी रघुनाथ गायकवाड (45, रा. भिवडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. आमचे पुण्यातील गुंडांशी संबंध आहेत पैसे नाही दिले तर जीवे ठार मारू अशी धमकी देखील आरोपींनी दिली आहे. भिंताडे पिता-पुत्रांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवडी येथील शेतजमिन गट क्रमांक 515 मधील 1 हेक्टर 20 आर आणि पोटखराबा 4 आर 2 रूपये 78 पैसे याप्रमाणे 1 हेक्टर 25 आर इतकी जमिन असून या मिळकतीपैकी 40 आर आणि 1 आर पोटखराबा असे एकुण 41 आर जमिन नंदा प्रकाश भिंताडे, दिपाली प्रकाश भिंताडे, चैताली प्रकाश भिंताडे आणि दिपक प्रकाश भिंताडे यांना वारसा हक्‍काने मिळालेली आहे. सन 2016 मध्ये सदर जमिन शहाजी गायकवाड यांनी शिवाजी राघू कोलते व वर्षा रविंद्र भिंताडे यांच्याकडून 20 लाख रूपयांना खरेदी केली.

दस्त क्रमांक 545/2015 वर संमती देणार म्हणून कांता उर्फ चंद्रकांत शंकर भिंताडे, सुदाम शंकर भिंताडे, अंजना गोविंद बोरकर, सुशिला किसन कुंभारकर आणि उषा मार्तंड बोरकर यांनी हिस्सेदार म्हणून स्वाक्षरी केल्या आहेत. त्यानंतर संग्राम शिवाजी कोलते यांनी शिवाजी रघुनाथ कोलते आणि बहिण वर्षा रविंद्र भिंताडे यांच्याविरूध्द सासवड येथील दिवाणी न्यायालयात जमिन वाटपाबाबतचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने सदरील दावा मान्य करून सदर जमिन पुन्हा संग्राम कोलते यांना देण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर त्यांच्या नावाची नोंद झाल्यानंतर त्यांनी ती जमिन विक्रीस काढली होती. त्यावेळी शहाजी गायकवाड आणि त्यांचे चुलत भावांनी दोघांमध्ये 43 लाख 70 हजार रूपयांना ती खरेदी केली. त्यानंतर फेरफार व दस्त नोंदणी करून त्याबाबतची नोंद सातबार्‍यावर करण्यात आली.

जमिनीतील सह हिस्सेदार कांता उर्फ चंद्रकांत शंकर भिंताडे तसेच त्यांची मुले सागर आणि मयुर यांनी जमिनीच्या उत्‍तर बाजूच्या ईशान्य कोपर्‍याकडील एक गुंठा जमिनीवर दि. 7 ऑगस्ट 2018 रोजी अतिक्रमण करीत कंपाऊंड करून घेतले. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर तुझा काही एक संबंध नाही, आम्ही या जमिनीचे मालक आहोत, ही जागा हवी असेल तर 50 लाख रूपये द्या अशी मागणी आरोपींनी केली. जमिनीचा ना सोडून दिला नाही तर एका रात्रीत गायब करू अशी धमकी देखील त्यांनी दिली. याप्रकरणी फिर्याद आल्यानंतर पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

You might also like