काँग्रेसने भाजपसोबत सत्तास्थापन करावी, ‘या’ माजी मुख्यमंत्र्याने दिला ‘अजब’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेसला शिवसेनेसोबत न जाता भाजपसोबत जाण्याचा अजब सल्ला दिला आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात समसमान मंत्रीपदे वाटून दिली जाणार आहेत. त्या बाबतच्या हालचाली सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.

कुमारस्वामी म्हणाले की, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर जास्त प्रमाणात आक्रमक असून भाजपचं हिंदुत्व थोडं मवाळ आहे. त्यामुळे काँग्रेसनं भाजपासोबत जाणं अधिक सोयीचं ठरेल असं अजीब मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केलं आहे. काल शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली मात्र आमच्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं कोण सत्तास्थापन करणार याचा सस्पेन्स शिगेला पोहचला आहे.

काल दिल्ली या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचे सांगत आहे असे विचारले असता, आम्ही सगळ्यांसोबत आहोत असे पवार म्हणाले आणि पत्रकारांमध्ये एकाच हशा उडाला. तसेच आमच्यात कोणत्याही कार्यक्रमाबाबत बोलणे झालेले नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. पवारांच्या या गुगळीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा कधी सुटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com