Fort In Pune | पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद, ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Fort In Pune | राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) कडक निर्बंध (Strict Restrictions) लागू केले आहेत. पर्यटन स्थळावर (Tourist Spot) देखील नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात (Fort In Pune) कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे असून या ठिकाणी पर्यटनासाठी अनेकजण येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील (Pune News) सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी (Ban) पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

 

पुण्यातील प्रतिबंधित पर्यटनस्थळे


1. मावळ तालुका Mawal – भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट (Rajmachi Point), मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज (Amrutanjan Bridge), वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी (Carla Caves), भाजे लेणी, लोहगड किल्ला (Lohgad Fort), तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, पवना धरण (Pavana Dam) परिसर इत्यादी. (Fort In Pune )

2. मुळशी तालुका Mulshi – लवासा (Lavasa), टेमघर धरण परिसर, मुळशी धरण (Mulshi Dam) परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी (Sahara City), काळवण परिसर

3. हवेली तालुका Haveli – घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला (Sinhagad Fort), डोणजे, खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसर

4. आंबेगाव तालुका Ambegaon – डिंभे धरण (Dimbhe Dam), आहुपे पर्यटनस्थळ

5. जुन्नर तालुका Junnar – शिवनेरी किल्ला (Shivneri Fort), सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र

6. भोर तालुका Bhor – रोहडेश्वर/विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण (Bhatghar Dam) परिसर, नीरा देवघर धरणे, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड

7. वेल्हा तालुका Velhe – तोरणा किल्ला (Torna Fort), राजगड किल्ला, पानशेत धरण (Panshet Dam), वरसगाव धरण परिसर

 

Web Title :-  Fort In Pune | All tourist places including forts in Pune district closed for tourists big decision
of government due to increasing incidence of Corona

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Employment News | संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी ! 9 क्षेत्रात रोजगार वाढला, ‘ही’ आहे सरकारी आकडेवारी

 

SSC-HSC Exam | शिक्षण विभागाच्या अस्पष्ट सूचना; दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाइन की ऑफलाइन वरून शाळा व्यवस्थापन संभ्रमात

 

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2022 : ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर