‘या’ किल्ल्यामध्ये आजही ‘चमत्कारी’ पारस दगडाचे ‘अस्तित्व’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगात आजही बर्‍याच गोष्टी अजूनही अस्तित्वात आहेत. ज्याबद्दल आपण या गोष्टी कथेमध्ये ऐकल्या आहेत. पारस स्टोन हा असाच एक चमत्कारी दगड आहे, आपण याबद्दल बर्‍याच कथा ऐकल्या असतील. परंतु आजपर्यत कोणालाही हा दगड सापडला नाही, मात्र हे एकून तुम्हाला आश्चर्य वाटले की, तो एका किल्ल्यात असल्याचा दावा केला जात आहे. हेच कारण आहे की, दरवर्षी लोक यासाठी वारंवार खोदकाम करण्यासाठी तेथे पोहतात.

तथापि, पारस दगडाबद्दल असे म्हणतात की, या दगडाला स्पर्श करतात लोखंड देखील सोने बनते. असा विश्वास आहे की, हा दगड भोपाळपासून 50 कि.मी. अंतरावर असलेल्या रायसेन किल्ल्यात आहे आणि असेही म्हणतात की, राजाकडे पारस दगड होता. तथापि, असेही म्हटले जाते की, या दगडासाठी अनेक युद्धे लढली गेली. पण जेव्हा किल्ल्याच्या राजाला असे वाटले की, आपण लढाईत पराभूत होऊ शकतो, तेव्हा त्याने पारस दगड तलावाच्या आत फेकला.

आजपर्यंत राजाने कोणास काही सांगितले नव्हते की, आपण पारस दगड कोठे लपविला आहे. नंतर युद्धादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि किल्लाही विरान झाला. अनेक राजांनी किल्ला खोदला आणि पारस दगड शोधण्याचा प्रयत्न केला. पण आजही त्यांना यश मिळालं नाही लोक पारस दगडाच्या शोधात रात्री तांत्रिक आणतात. पण तरीही त्यांना यश मिळत नाही.