खा. डॉ. अमोल कोल्हेंच संसदेत ‘कडक’ भाषण ; म्हणाले, किल्‍ले रायगडाला राजधानीचा दर्जा द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी केली.यावेळी संसदेत भाषण करताना त्यांनी विविध मुद्यांवर सरकारचे आणि सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

किल्ले रायगडला राजधानी करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले कि, जर, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विचार होत असेल, तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचाही विचार केला पाहिजे. रायगड किल्ल्याची शासनाने जपणूक करुन राजधानी केल्यास, ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल, असंही त्यांनी  म्हटलं.

यावेळी त्यांनी म्हटलं कि, बहुमताच्या सरकारकडे सर्व प्रकारचे अधिकार आहेत. त्यांनी ठरवले तर सर्व काही शक्य आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नांबरोबरच कुपोषणाचा मुद्दा, शेतकरी आत्महत्या,तसेच बेरोजगारी यांसह विविध विषयावर त्यांनी भाषण करताना सरकारचे याकडे लक्ष वेधले.

रायगडसह अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. महाराजांनी या वास्तू स्वत:च्या नावे केल्या नाहीत किंवा कुटुंबातील व्यक्तींच्याही नावे केल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या या स्मारकांना आपण जपणे गरजेचे आहे. महाराजांनी हे किल्ले रयतेची संपत्ती  म्हणून सांभाळले, त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
दरम्यान, त्यांच्या या भाषणावर केंद्र सरकार काय पाऊल उचलते आणि महाराष्ट्रातील खासदार त्यांना या मागणीसाठी समर्थन देतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

दातांवरून जाणून घेता येऊ शकते , तुमचे आरोग्य किती चांगले