सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका अन् Fortune cooking oil ने मागे घेतल्या ‘त्या’ सर्व जाहिराती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गेल्या आठवड्यात भारताचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, गांगुली आजारी पडल्यानंतर तो जाहिरात करत असलेल्या Fortune Rice Bran cooking oil च्या सर्व जाहिराती मागे घेतल्याचे अदानी विल्मारने जाहीर केले. Fortune Rice Bran cooking oil हे निरोगी हृदयासाठी फायद्याचे असल्याची जाहिरात गांगुलीने केली होती. या जाहिराती मागे घेण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली व त्यांना ट्रोलही केले गेले. ”हे तेल तुमची प्रतिकारशक्ती वाढवते,”अशी या जाहिरातीची टॅगलाईन होती. सौरव गांगुलीला ( Sourav Ganguly) हृयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ट्रोल केले गेले.

शनिवारी छातीत दुखू लागल्यामुळे गांगुलीला कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारली असून बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. अनेक भारतीयांमध्ये हृदयासंदर्भात आढळणारा आजार गांगुलीला झाला आहे. पण, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याच्यावर नित्यक्रमाने अँजिओप्लास्टीची गरज आहे आणि औषध व काळजी घेतल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा कामकाज करू शकतो. पुढील दोन आठवड्यात त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, असे शेट्टी यांनी सांगितले.

गांगुलीवर उपचार करण्यासाठी 13 वैद्यकिय सदस्यांची टीम काम करत होती. गांगुलीची अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान, माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनीही फॉर्च्युनच्या जाहिरातीवरून गांगुलीला टोमणाही मारला आणि प्रकृती सुधारण्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.