आर्थिक व्यवहारातून प्रौढाचा दगडाने ठेचून खून

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर शहरापासून काही अंतरावर एका ४० वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सकाळी दिंडनेर्ली-देवाळे मार्गावर उघडकीस आली आहे. शहाजी आण्णाप्पा भाटे (वय-४० रा. हळदी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

दिंडनेर्ली-देवाळे मार्गावर शहाजी भाटे यांचा मृतदेह आज सकाळी नागरिकांना आढळून आला. या घननेची माहिती नागरिकांनी करवीर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शहाजी भाटे याचा आर्थिक वादातून खून झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र पिंगळे यांच्यासह अधीका-यांनी घटनास्थळी भेट दिली. कागल येथील खुनानंतर काही तासातच देवाळे रस्त्यावरील हार्डीकर डोंगराजवळ ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. करवीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

जाणून घ्या.. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

‘हे’ आहेत AC मध्ये बसण्याचे ‘वाईट’ परिणाम ; मेंदूवरही पडतो ‘असा’ प्रभाव

‘होमिओपॅथी’ औषधींमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते

ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान ; यकृत पुण्यात तर दोन्ही मूत्रपिंड मुंबईत

You might also like