‘गलवानच्या संघर्षात चीनला मोठा फटका’, रशियन वृत्तसंस्थेचा मोठा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारत आणि चीनी सैन्य माघारी घेतल्याच्या प्रक्रियेची बातमी देताना रशियन वृत्तसंस्था तास नं एक मोठा दावा केला आहे. तासनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे 45 सैनकि ठार झाले आहेत. तर भारताचे 20 जवान शहिद झाले आहेत.

काल चीनच्या संरक्षण मंत्रालयानं सर्वप्रथम सैन्य माघारी सुरू झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत या संबधी माहिती दिली. गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले किती सैनिक ठार झाले हे चीननं अद्याप जाहीर केलेलं नाही.

काही माध्यमांनी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यानं गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचं म्हटलं आहे. गलवानमधील या घटनेच्या 7-8 महिन्यांनंतर आता दोन्ही देश तणाव कमी करण्याच्या दिशेनं पाऊलं टाकत आहेत.

लडाखच्या पूर्व भागात असलेल्या पँगाँग लेक परिसरातून भारत आणि चीन या दोन्ही देशात समेट झाला आहे. इतकंच नाही तर परस्पर सहमतीनं त्यांनी सैन्यही मागे घेतलं आहे अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत बोलताना दिली.

राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे अशी घोषणा राज्यसभेत केली. 1962 च्या पूर्वीपासून भारताच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रभाव पडल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारनं निवेदन द्यावं अशी मागणी केली होती. त्यानुसार राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली.