धक्‍कादायक ! नवविवाहीतेचा जळालेला मृतदेह आढळल्याने ‘खळबळ’

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – रिसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी भसडे येथे एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिपाली काळे असे या तरुणीचे नाव असून सहा महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. दिपालीच्या घरच्यांनी हुंड्यासाठी मुलीला मारल्याचा आरोप सासरच्या लोकांवर केला आहे. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा दिपालीच्या घरच्यांनी घेतल्याने रिसोड पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण आहे.

दिपाली काळे ही हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील रहिवाशी आहे. तिचा विवाह सहा महिन्यापूर्वी कोयाळी येथील शाम काळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. माहेराहून सात लाख रुपये आणण्यासाठी तिचा शारिरीक आणि मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. पैसे आणत नसल्याच्या कारणावरून तिचा खून केल्याचा आरोप दिपालीच्या नातेवाईकांनी केला आहे.

दिपालीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समजताच तिच्या नातेवाईकांनी रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केल्यामुळे तणाव निर्माण झाला. तसेच जोपर्यंत दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत्याने पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत घालण्यात येत आहे. पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

सिने जगत –

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like