‘बेपत्ता’ झालेले सीसीडीचे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह ७२ तासानंतर सापडला

मंगळुरु : वृत्तसंस्था – गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले कॅफे कॉफी डे चे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ (वय ६०) यांचा मृतदेह नेत्रावती नदीकिनारी मिळाला आहे. सिद्धार्थ हे सीसीडीचे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच भाजपा नेता एस एम कृष्णा यांचे जावई होते. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कोटेपुरा परिसरात नेत्रावती नदीच्या पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला.

सिद्धार्थ हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रही लिहिले होते, त्यात त्यांनी कर्जदारांचा मोठा दबाव असल्याचा उल्लेख केला होता. सोमवारी ते मोटारीने मंगलुरु येथे जात होते. वाटेत ते बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांना सोमवारी रात्री पाहिल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला नदीत शोध घेतला. त्यानंतर एनडीआरएफ, तटरक्षक, होमगार्ड, अग्निशमन विभागाची पथके पुलाखाली शोध घेतला जात होता. त्यानंतर सुमारे ७२ तासानंतर बुधवारी पहाटे त्यांचा पुलाखालीच मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. देशातील सर्वात मोठ्या व लोकप्रिय कॅफे कॉफी डेची साखळी रेस्टाॅरंट यांनी उघडली होती. त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद देशभर मिळाला आहे. असे असतानाही त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय