दारुच्या नशेत विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या काॅंग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराला अटक ; जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दारुच्या नशेत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व अरुण धोटे यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष धोटे हे कल्याण इन्स्टिट्युट ऑफ नर्सिग व इन्फन्ट जिजस सोसायटीचे अध्यक्ष आहेत. कल्याण इन्स्टिट्युटमधील तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण इन्स्टिट्युट ऑफ नर्सिग येथे ही विद्यार्थीनी एएनएम या अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात शिकत आहे. तिला तेथील प्राचार्य गुरुराज कुलकर्णी हे वारंवार अश्लील भाषेत बोलून तिचा छळ करीत होते. त्याची तक्रार तिने संस्थाचालक सुभाष धोटे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर २९ आक्टोबर २०१८ रोजी रात्री वसतीगृहाच्या प्रांगणात प्राचार्य व इतर दोघांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने भावाला बोलावून घेतले. ते ३० आक्टोबरला राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले होते. त्यावेळी संस्थाचालक अरुण धोटे यांनी जबरदस्तीने तेथून त्यांना घेऊन सुभाष धोटे यांच्या घरी नेले. तेथे त्यांना जीवे मारण्याची व शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिली, असे पिडित तरुणीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तिला वसतीगृहातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. त्यामुळे ती भाड्याची खोली घेऊन राहत होती. राजुरा वसतीगृह अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिचा पाठलाग होऊ लागला. तिच्या खोलीवर पाळत ठेवली जात असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे भितीने तिने खोलीही सोडली. आता आपले शैक्षणिक नुकसान होत असल्याने आपण तक्रार देण्यास पुढे आल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी याप्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विनयभंगासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन सुभाष धोटे व अरुण धोटे यांना अटक करण्यात आली आहे.

Loading...
You might also like