खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील फरार चार आरोपी अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – सोमाटणे येथे पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या गुन्हेगाराना शिरगाव पोलीस चौकीच्या पोलिसांनी गुन्हे अटक केली आहे. प्रसाद उर्फ परशा टेभेकर (रा. उर्से) आकाश साळुखे, हर्षद भोकरे, (रा. शिवणे), अनु उर्फ अनूराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) या चौघांना अटक केली आहे.

तर केतन दत्तात्रय पोकळे (22, रा. सोमाटणे फाटा) याला खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. रोहन दिनकर गरोडे असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी अदित्य विलास गराडे व रोहन दिनकर गराडे असे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून एका कंपनीमध्ये चहा घेऊन जात होते.

परंदवडी – सोमाटणे रोडवरील ओढ्याजवळ आरोपींनी आपसांत संगनमत करून रोहन गराडे यास पूर्वीचे भांडण्याचे कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी तळेगाव दभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खूनी हल्ल्यातील आरोपीची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना अटक केली.

हि कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अतिरिक्‍त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी त्यांच्या टीम ने केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/