हैदराबाद महिला डॉक्टरच्या बलात्कार, खुन प्रकरणातील चारही आरोपींचा ‘एन्काऊंटर’

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन :  महिला डॉक्टरावर सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर खुन केल्या प्रकरणी चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला़ ही घटना ज्या ठिकाणी या महिला डॉक्टरांवर बलात्कार केला व त्यानंतर जीवंत जाळून मारण्यात आले, तेथेच ही घटना पहाटे ३ वाजता घडली.

हैदराबाद येथील टोलनाक्यावर या पशुवैद्यक डॉक्टर महिलेने टोलनाक्यावर आपली दुचाकी लावली होती. तिच्यावर पाळत ठेवून त्यांनी तिला जबरदस्तीने जवळच्या एनएच ४४ या महामार्गाच्या पुलाखाली नेऊन तिच्यावर या चौघांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पेटवून देऊन जीवंत जाळण्यात आले होते. गेल्या गुरुवारी २८ नोव्हेंबरला हा प्रकार घडला.

या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपींना जेथे ही घटना घडली. तेथे नेण्यात आले होते. क्राईम सीन कसा घडला. ते समजावून घेण्यासाठी आरोपींना त्याच वेळेला तेथेच कसा घडला त्यातून पोलीस पहात होते. चारही आरोपी पोहचले. ते कसा घडला, हे सांगत असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, ते पळून जाऊन लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यु झाला. असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Visit : Policenama.com