शाहूवाडी पोलीस ठाण्यातील लॉकअप मधून चार आरोपींनी ठोकली धूम

कोल्हापूरः पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यातील लाॅकअप मधून चार आरोपींनी धूम ठोकली आहे. चक्क पोलीसांच्या लाॅकअप मधून आरोपींनी पळ काढल्यामुळे कोल्हापूर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. विविध प्रकरारच्या गुन्ह्यामध्ये या आरोपींना अटक करण्यात आली होती.या सर्व आरोपींना शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या लाॅकपमध्ये ठेवले होते. सकाळी लाॅकअप पाहिले असता चार आरोपी फरार झाल्याचे दिसले. सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे लाॅकअपचे बार वाकवून चार आरोपी फरार झाले आहेत.

सुरज सर्जेराव डबडे (वय – २२ रा . वाठार पैकी कासारवाडी ,हातकणंगले ,कोल्हापूर), ओंकार महेश सूर्यवंशी (वय – १९ रा . बॅंक ऑफ इंडिया समोर, कासेगाव ,ता . वाळवा जिल्हा सांगली ) गोविंद वसंत माळी (वय – १९ रा . यशवंतनगर कॉलनी कासेगाव सांगली ) विराज गणेश कारंडे (वय – १९ रा . पाडळी दरवेज ता . हातकणंगले कोल्हापूर ) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे असून, सदरच्या आरोपींना दिनांक 20 मे पर्यंत पोलीस रिमांड देण्यात आले होते. या आरोपींवर दरोडा, घरफोडी यासारखे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहेत.

आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

संबंधित घडामोडी:

कोल्हापूरातील ‘ते’ झोपलेले पोलीस निलंबित

लाॅकअपमधून फरार झालेल्या चार पैकी दोन आरोपींना पेठ वडगाव पोलिसांनी पकडले

कोल्हापूर पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई