खून प्रकरणातील चार आरोपी 24 तासात अटकेत 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीला फोन करुन, सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात असणाऱ्याचा, पती आणि नातेवाईकांनी कट आखून खून केला. या गुन्ह्यातील चौघाना गुन्हे शाखा युनिट पाच आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी 24 तासात अटक केली.

किस्मतकुमार उर्फ संजयकुमार रविलाल उर्फ अनिरुध्द शर्मा (19, रा मु.करुम तहसिल बलीयाबेलॉन जि कटीहार राज्य बिहार सध्या रा निलया कन्स्ट्रक्शन बिल्डींग, जुना पुणे मुंबई हायवे लगत ए.बी.पी. पेट्रोल पंपासमोर तळेगाव दाभाडे) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

किस्मतकुमार हा गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घराबाहेर पडला होता. याबाबत किस्मतकुमारच्या खोलीच्या शेजारी राहणारा इसम नामे बाबूलाल मंगल मिश्रा (30, रा धटखोलवा, तहसिल/ठाणा बराडाकोढी, जि पुर्णीया राज्य बिहार सध्या रा निलया कन्स्ट्रक्शन बिल्डींग, जुना पुणे मुंबई हायवे लगत ए.बी.पी. पेट्रोल पंपासमोर तळेगाव दाभाडे, पुणे) त्याचेकडे सखोल चौकशी केली.  किस्मतकुमार त्याचेसह राहणारा मंगल श्रीमान शर्मा (36, रा वहिरवटोला (बलिहारपुर) तहसिल कदवा जि कटीहार राज्य बिहार सध्या रा निलया कन्स्ट्रक्शन बिल्डींग, जुना पुणे मुंबई हायवे लगत ए.बी.पी. पेट्रोल पंपासमोर तळेगाव दाभाडे, पुणे) याच्या होता यातून दोघांमध्ये भांडण होती.

या गोष्टीचा राग मनामध्ये धरुन मंगल शर्मा, त्याचा पुतण्या करण रमेश शर्मा (22, रा वहिरवटोला (बलिहारपुर) तहसिल कदवा जि कटीहार राज्य बिहार सध्या रा निलया कन्स्ट्रक्शन बिल्डींग, जुना पुणे मुंबई हायवे लगत ए.बी.पी. पेट्रोल पंपासमोर तळेगाव दाभाडे, पुणे), मित्र धरमेंदर मेहेंदर शर्मा (24, रा धनगवा तहसिल कदवा जि कटीयार राज्य बिहार) आणि बाबुलाल मिश्रा यांनी किस्मतकुमार यास कायमची अद्दल घडविण्याचे ठरवले. किस्मतकुमार हा रात्री दोनचे सुमारास नैसर्गीक विधीकरता गेला असता त्याचा कुदळ, बेंडबार व लोखंडी पाईप याने वार करुन खुन केला. मंगल श्रीमान शर्मा, बाबूलाल मंगल मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हि कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहआयुक्त प्रकाश मुत्याळ, अपरआयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, गुन्हे शाखा, युनिट चारचे पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, फारुक मुल्ला, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, श्यामसुदर गुट्टे, दयानंद खेडकर, संतोष आसवले, गोविंदराव चव्हाण,  गोपाळ ब्रम्हांदे व धनाजी शिंदे यांनी केली आहे.

करण शर्मा यास मुळगावी जात असताना नाशिक येथुन तर धरमेंदर मेहेंदर शर्मा याला लेबर कॅम्प तळेगाव येथुन अटक केली आहे. हि कामगिरी पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईकपाटील यांचे मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक निरीक्षक साळी, पोलीस उपनिरीक्षक बाजगीरे, पोलीस कर्मचारी बंडु मारणे, पुणेकर, गुरव, आकाश भालेराव, तारु, गोरे व मिसाळ यांनी केली आहे.