हुंड्यासाठी महिलेचा छळ, गुप्तांगामध्ये सळई घालून निर्घृण खून ; कर्नाटकातील चार आरोपी पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हुंड्यासाठी महिलेचा छळ करून तिच्या गुप्तांगामध्ये सळई घालून तिचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यातील एका आरोपीला हडपसरमधून अटक केली तर उर्वरीत तिघांना कोंढवा येथील कैसबाग परिसरातून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना विजापूर जिल्ह्यातील गांधीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हा प्रकार ८ जून २०१९ रोजी घडला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी पुण्यात येऊन लपले होते.

रविन अश्पाक कालेकोटे (वय-२६ रा बबलेश्वर नाका, विजापूर) असे निर्घृण खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अश्पाक फकरुद्दीन कालेकोटे (वय-४६), सासरे फकरुद्दीन कालेकोटे, सासु रहमत कालेकोटे आणि नणंद आसमा कालेकोटे, दिर अलताफ कालेकोटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अश्पाक कालेकोटे याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. अलताफ याला हडपसर तर उर्वरीत आरोपींना कौसरबाग परिसरातून अटक करण्यात आली.

हुंड्याच्या कारणावरून आरोपींनी अश्पाकचा निर्घृण खून केला. आरोपी पती अश्पाक याचे हे तिसरे लग्न होते. घटना घडल्यानंतर आरोपींनी पुण्यामध्ये लपून बसल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली. गुन्ह्यातील आरोपील अलताफ हा हडपसर येथील गल्ली नंबर २७ मधील त्याच्या सासुरवाडीत लपून बसल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली. कर्नाटक पोलिसांनी वानवडी पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. वानवडी पोलिसांनी एक पथक तयार करून हडपसर परिसतात अलताफचा शोध घेऊन ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील इतर आरोपी रामनगर येथे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी रामनगर येथे जाऊन चौकशी केली असता आरोपी कोंढवा येथील कौसरबाग येथे गेले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कौसरबाग परिसरात आरोपींचा शोध घेऊन अटक केली.

ही कारवाई वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब करचे, पोलीस शिपाई प्रतिक लाहिगुडे, शिरीष गोसावी, नितेश पुंडे, सुदर्शन म्हांगरे, अजिंक्य नानगुडे, सुधिर सोनवणे, नासिर देशमुख, सागर नवले, गांधीचौक पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अधिकारी कुचबाळ, दिपा रजपुत, सुरेश आडके, व्हिएन शापुर यांच्या पथकाने केली.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप