पुणे / पिंपरी : आयपीएलवर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक

आरोपींमध्ये सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएल सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चार जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही कारवाई वाकड येथील सिध्दीविनायक अपार्टमेंटमध्ये करण्यात आली.

विशाल राजु अग्रवाल (वय २० रा. पिंपरी), अनिल आदेश कृपलानी (वय-३१ रा. साईचौक, पिंपरी), दिनेश पैलाजराय बदलानी (वय-३२, रा. काळेवाडी), राहुल तुकाराम कवाष्टे (वय-४२ रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राहुल कवाष्टे हा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये रोखपाल म्हणून काम करतो.

वाकड परिसरातील सिद्धीविनायक अपार्टमेंटमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील शैलेश सुर्वे व आशिष बोटके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिद्धीविनायक अपर्टमेंटमधील फ्लॅट नंबर २०१ येथे छापा टाकला. यावेळी आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेताना चौघाना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक शरद आहेर, पोलीस कर्मचारी राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, विक्रात गायकवाड, आशिष बोटके, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, शरिफ मुलाणी यांच्या पथकाने केली.