WhatsApp वर एकाचवेळी 1000 लोकांना ‘भाव’ पाठवून सट्टा खेळण्यास उत्साहित करणारे चौघे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख 20 हजार रुपये, 5 कॅल्क्युलेटर, 11 मोबाईल आणि सट्ट्यासंबंधित माहिती असणाऱ्या काही डायऱ्या जप्त केल्या आहेत. या व्यक्ती व्हाट्सअपवरून 1 हजार लोकांना ऑनलाईन सट्ट्याचे भाव पाठवून तो खेळण्यासाठी ते लोकांना प्रवृत्त करत असतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील, राहुल, जयपाल आणि अमरीश या चार आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी व्हाट्सअपवरून 1 हजार लोकांना ऑनलाईन सट्ट्याचे भाव पाठवत असतं. ओके आल्यानंतर ते व्यवहार नक्की करत असतं. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 11 मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या व्यवसायाची दररोज लाखो रुपयांची उलाढाल असल्याची माहिती देखील पोलीसांनी दिली. सुनील हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याला मागील वर्षी देखील या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा जागा बदलून आपला व्यवसाय सुरु केला होता.

रोखीबरोबरच ऑनलाईन घेत असे पैसे
आरोपी राहुल कुमरावत हा सुनीलचा मित्र असून पैशाच्या लोभापायी तो या व्यवसायात आला. व्हाट्सअपवरून 1 हजार लोकांना ऑनलाईन सट्ट्याचे भाव पाठवून तो लोकांना खेळण्यासाठी प्रवृत्त करत असे. जयपाल हा देखील मागील पाच महिन्यांपासून सुनीलबरोबर होता. तर अमरीश हा विजेत्यांना त्यांची रक्कम विविध ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून वितरित करण्याचे काम करत असे.

Visit : Policenama.com